मुंबई - बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमध्ये सिद्धार्थ शुक्लाची आठवण जागवण्यात आली. यावेळी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक म्हणाला की, सिध्दार्थच्या निधनाने सर्वांना सुन्न केले आहे. बालिका वधू या गाजलेल्या मालिकेतून आणि बिग बॉस या शोमुळे सिध्दार्थचे नाव देशातील घराघरात पोहोचले होते. अशा या उभरत्या सिताऱयाचे गुरुवारी वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. करण जोहर होस्ट करीत असलेल्या बिग बॉस ओटीटीमध्ये सिध्दार्थ शुक्लाचा व्हिडिओ मोंटाज दाखवण्यात आला. बिग बॉसमध्ये त्याने गाजवलेला काळ व त्याच्या इतर आठवणी यावेळी व्हिडिओतून जागवण्यात आल्या. यावेळी करण जोहरने भावूक होऊन सिध्दार्थला श्रध्दांजली वाहिली.
"सिद्धार्थ शुक्ला हे नाव आमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले होते. तो बिग बॉस कुटुंबातील आवडता सदस्य होता. एक मित्र, केवळ माझ्यासाठीच नाही तर आमच्या उद्योगातील इतरांचाही तो मित्र होता. तो आम्हाला अचानक सोडून निघून गेला.", असे करण म्हणाला.
सिध्दार्थ शुक्लाबद्दल बोलताना करण जोहर गहिवरला आणि म्हणाला की दिवंगत अभिनेत्याचा वारसा कायम राहील. " त्याचा मृत्यू ही अशी एक गोष्ट आहे ज्यावर अजूनही आपला विश्वास बसत नाही. मी सुन्न झालो आहे, माझा श्वास अडखळतोय.
"सिद एक चांगला मुलगा, एक चांगला मित्र आणि आसपास आणि सोबत राहण्यासाठी एक ग्रेट माणूस होता. त्याने सकारात्मक उर्जा आणि हास्याने लाखोंची मने जिंकली. सिध्दार्थला शांती मिळो, मी तुला कायमचा हरवून बसलोय.", असेही करण पुढे म्हणाला.
सिद्धार्थ शुक्लाची कारकिर्द