मुंबई - कॉमेडियन कपील शर्माच्या घरात पाळणा हालला आहे. तो एका गोड मुलीचा बाप बनलाय. त्याने चिमुकलीचे फोटो शेअर करुन ही आनंदवार्ता चाहत्यांना कळवली आहे. मुलीचे नाव त्याने अनायरा ठेवलंय.
फोटोत कपील आपली मुलगी न्याहळत असल्याचे दिसते. सोबत त्याची पत्नी गिन्नीही दिसत आहे. कपीलने दोन फोटो शेअर केले आहेत.
दुसऱ्या फोटोत अनायरा एकटी आहे आणि ती खूपच सुंदर दिसत आहे. या गोड मुलीला टोपीही घालण्यात आलीय. कपीलने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''आमच्या काळजाच्या तुकड्याला भेटा. अनायरा शर्मा. सर्वांचा आभारी आहे.''
कपीलच्या या फोटोवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली असून गायिका नेहा कक्कडने अनायराला पाहायला लवकरच येत असल्याचे म्हटलंय. अर्चना पुरण सिंग, रणवीर सिंगसह बॉलिवूडच्या अनेकांनी कपील आणि गिन्नी शर्माचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.