महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कर्नाटकच्या मदतीसाठी धावून आले कपिल शर्मा आणि भूमी पेडणेकर! - bhumi pednekar

कोरोनाच्या या काळात अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि कपिल शर्मा कर्नाटकच्या मदतीला धावून आले आहेत.

मोबाईल सेवा
मोबाईल सेवा

By

Published : May 30, 2021, 2:25 PM IST

मुंबई -जेव्हा जेव्हा देशावर संकट आलंय तेव्हा तेव्हा मनोरंजनसृष्टीतील कलाकार मदतीसाठी धावून आलेत. पूर्वी युद्धप्रसंगी सुनील दत्त आपल्या सहकलाकारांसोबत सीमेवरील जवानांच्या मनोरंजनासाठी जात असे. ओला किंवा सुका दुष्काळाच्या प्रसंगात हिरो-हिरॉइन्स ट्रकमधून ‘चंदा’ गोळा करायला बाहेर पडत. आताही देश कोरोना संकटातून जात असताना अनेक कलाकार मंडळी समाजाला मदत करताना दिसताहेत. यात भूमी पेडणेकर, जी स्वतः कोरोनाची शिकार झाली होती, विविध पद्धतीने मदतकार्य करताना दिसत आहे. तिच्यासोबत विनोदवीर कपिल शर्मा सुद्धा जुळला गेला असून, ते दोघे कर्नाटकच्या मदतीसाठी धावून गेले आहेत.

ऑक्सिजन बेड
युवा बॉलिवूड स्टार भूमी पेडणेकर, कोविड काळात देशभरातील लोकांना मदत करण्यात अथक प्रयत्न करताना दिसत आहे. कर्नाटकातील व्हायरसशी झुंज देणाऱ्या रुग्णांना मदत करण्यासाठी आता कपिल शर्माबरोबर तिने भागीदारी केलीय. श्री श्री रविशंकर मिशन जिंदगी उपक्रमातही भाग घेणाऱ्या भूमीने आता कर्नाटकमधील लोकांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी कपिलशी हातमिळवणी केली आहे. या कार्यक्रमात गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी होसकोट, देवनहल्ली, दोडबल्लापूर, नेलामंगला १ आणि नेलमंगला २ मधील कोविड हॉस्पिटलच्या बाहेर ऑक्सिजन बस पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कपिल शर्मा आणि भूमी पेडणेकर!
याबद्दल बोलताना भूमीने सांगितले की, “आपल्या देशात सध्या या प्राणघातक विषाणूची दुसरी लाट आहे जी आता ग्रामीण भारतात घुसली आहे. लहान शहरे आणि खेड्यांमधून अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत जिथे वैद्यकीय सहाय्य आणि मदत मर्यादित असू शकते. रुग्णांना ऑक्सिजन पुरविणे ही काळाची गरज आहे. मिशन जिंदगीच्या माध्यमातून आम्ही आमचे लक्ष ग्रामीण भारताकडे केंद्रित करीत आहोत आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांपासून सुरुवात करीत आहोत.”ती पुढे असंही म्हणाली की, “आमच्या बसमध्ये ऑक्सिजन केंद्रे बसविली जातील जी जिल्हा रूग्णालयाच्या आपत्कालीन परिस्थितीबाहेरील रूग्णांना बेडची वाट पहात असताना इतर सेवा पुरवतील. आमच्या बसेस ज्या छोट्या शहरांमध्ये आता ही प्रकरणे वाढत आहेत त्या रुग्णालयांचे ओझे कमी करण्यास मदत करतील. मला आनंद वाटतो की, कपिलबरोबर कामात सहभागी झाले आहे. कोविड रूग्णांना आवश्यक तेवढी मदत मिळावी, यासाठी मी आणि कपिल प्रयत्न करीत आहोत. या अभियानासोबत जोडलेला कपिल शर्मा म्हणाला, “आताच्या घडीला मानव म्हणून आपल्याला एकमेकांच्या पाठिंब्याची गरज आहे. मी समाजाप्रती असलेले माझे कर्तव्य बजावत आहे. गुरुदेव आणि बी.जे.एस. (भारतीय जैन संघटना) जी विलक्षण कामे करत आहेत त्यात सहभागी होण्यात माझा सन्मान आहे. कोविड मुक्तीसाठी आम्ही मोबाईल ऑक्सिजन बसच्या पुढाकाराने, कर्नाटकातील लोकांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. आणि हा उपक्रम लवकर अधिक राज्यांत नेण्याची योजना आखली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details