महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरोना: कनिका कपूरची चौथी टेस्टही पॉझिटिव्ह - कनिका कपूरची कोरोना व्हायरसची चौथी टेस्ट आली पॉझिटीव्ह

बॉलिवूड गायिका कनिका कपूर चौथ्या चाचणीतही कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. तिच्यावर उपचार सुरू असले तरी सतत येणाऱ्या पॉझिटिव्ह चाचण्यांपुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत.

Kanika Kapoor
गायिका कनिका

By

Published : Mar 29, 2020, 6:59 PM IST

लखनौ - बॉलिवूड गायिका कनिका कपूर कोरोना व्हायरसच्या चौथ्या चाचणीतही पॉझिटिव्ह ठरली आहे. तिच्या जवळच्या नातेवाईकांनी या बातमीला दुजोरा दिला. तिच्यावर उपाय सुरू असले तरी सतत येणाऱ्या पॉझिटिव्ह चाचण्यामपुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत.

कनिकाचा संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS)मध्ये उपचार सुरू आहेत. कनिकाचा पहिल्यांदा कोरना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आल्यानंत २० मार्च रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या पूर्वी ती लंडनहून ९ मार्चला भारतात परतली होती. त्यानंतर तिने कानपूर आणि लखनौमध्ये प्रवास केला होता. याकाळात तिचा खोकला आणि ताप वाढला होता.

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची चौथी टेस्ट पॉझिटिव्ह

तिच्या नात्यातील एकाने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले, ''तिच्या टेस्ट रिपोर्ट्समुळे आम्ही घाबरलो आहोत. याचा अर्थ उपचारांना कनिकाचे शरीर साथ देत नाही. या लॉकडाऊनच्या काळात तिला आम्ही अॅडव्हान्स ट्रिटमेंटसाठी शिफ्टही करू शकत नाही. ती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यापलीकडे आमच्या हातात काहीच उरलेले नाही.''

तथापी, संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या डॉक्टरांनी कनिकाची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कनिकाचा मित्र ओजस देसाईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ओजस दोन दिवस कनिकासोबत हॉटेल ताजमध्ये राहिला होता. त्यानंतर तो भूमिगत झाला होता. ओजसच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात त्याने म्हटलंय, की त्याने मुंबईच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात स्वतः ची कोरोनाची चाचणी केली होती. यात तो निगेटिव्ह ठरला. इतकेच नाही तर त्याने आपला रिपोर्ट सोशल मीडियावरही पोस्ट केला होता. या महिन्याच्या सुरूवातील कनिका लखनौच्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्व जण निगेटिव्ह ठरले आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details