महाराष्ट्र

maharashtra

कंगनाचा 'मेंटल है क्या' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, सायक्रेटिक सोसायटीची सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार

या चित्रपटाचे पोस्टर आणि टीजरमधून दोघांचाही लूक समोर आला होता. सोशल मीडियावर या पोस्टरला चाहत्यांची पसंतीही मिळाली. मात्र, प्रदर्शनाच्या पूर्वीच या चित्रपटाच्या शिर्षकावरुन वादंग निर्माण झाले आहेत.

By

Published : Apr 19, 2019, 2:43 PM IST

Published : Apr 19, 2019, 2:43 PM IST

कंगनाचा 'मेंटल है क्या' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात


मुंबई -बॉलिवूड 'क्विन' कंगना रनौत आणि अभिनेता राजकुमार राव यांची जोडी 'मेंटल है क्या' या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीजरमधून दोघांचाही लूक समोर आला होता. सोशल मीडियावर या पोस्टरला चाहत्यांची पसंतीही मिळाली. मात्र, प्रदर्शनाच्या पूर्वीच या चित्रपटाच्या शिर्षकावरुन वादंग निर्माण झाले आहेत.

'मेंटल है क्या' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ज्याप्रकारे कंगना आणि राजकुमार ब्लेडसोबत खेळताना दिसतात हे मानसिक विकारांचं विचित्र चित्रण असल्याचे इंडियन सायक्रेटिक सोसायटीने म्हटले आहे. याबाबात त्यांनी सेन्सॉर बोर्डाला तक्राररुपी पत्रही पाठवले आहे. या चित्रपटाचे नाव बदलण्यात यावे तसेच, ही दृश्यदेखील काढण्यात यावी, अशी मागणी या पत्रातुन करण्यात आली आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, सायक्रेटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मृगेश वैष्णव सांगतात, की भारतातील एक चतुर्थांश संख्या ही मानसिक आजारांनी पीडित असलेल्या व्यक्तींची आहे. अनेक जण यावर उपचार करण्यासाठी ढोंगी बाबांच्याही आहारी जातात. या आजारावर मात करण्यासाठी मनोबल आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या सिनेमातुन अशाप्रकारचे चित्रण करणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

चित्रपटाबाबत झालेल्या या तक्रारीवर कंगना किंवा राजकुमार यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. मात्र, आपले परखड मत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेली कंगना यावर काय प्रतिक्रीया देते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details