मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिचं स्पष्ट मत व्यक्त करत असते. आताही तिच्या एका वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. सध्या तिने वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंग यांच्याबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे. इंदिरा यांनी निर्भयाच्या आईला या प्रकरणातील आरोपींना माफ करा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या विधानावर कंगनाने टीकास्त्र सोडले आहे.
कंगना रनौतचं इंदिरा जयसिंगवर टीकास्त्र, म्हणाली अशा महिलांना.... - kangna ranaut news
इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाच्या आईला या प्रकरणातील आरोपींना माफ करा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या विधानावर कंगनाने टीकास्त्र सोडले आहे.
![कंगना रनौतचं इंदिरा जयसिंगवर टीकास्त्र, म्हणाली अशा महिलांना.... Kangana Ranaut on senior lawyer Indira Jaising's statement](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5809569-1014-5809569-1579761061711.jpg)
कंगना रनौतचं इंदिरा जयसिंगवर टीकास्त्र, म्हणाली अशा महिलांना....
आपल्या आगामी 'पंगा' या चित्रपटाच्या प्रिमिअर दरम्यान कंगनाने माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान तिने इंदिरा जयसिंग यांच्याबाबत आपला संताप व्यक्त केला. 'या महिलेला चार दिवस निर्भया प्रकरणातील आरोपींसोबत तुरुंगात ठेवायला हवे. अशा महिलांना आरोपींवर दया तरी कशी येते. अशाच महिलांच्या पोटी असे नराधम जन्म घेतात', अशा शब्दात कंगनाने आपले मत मांडले.
यावेळी कंगनासोबत 'पंगा' चित्रपटाच्या दिग्दर्शिक अश्विनी अय्यर तिवारी आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा देखील उपस्थित होती.