मुंबई - सध्या कलाविश्वात सेलेब्रेटींच्या लग्नाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. बरेच कलाकार यावर्षी लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. छोट्या पडद्यावरील कलाकारही आपल्या भावी आयुष्याला सुरुवात करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीचा बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत साखरपुडा झाला होता. त्यांचा विवाहसोहळा देखील थाटामाटात पार पडला आहे.
काम्या आणि शलभच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर तिने मेहंदी, हळदी या समारंभाचेही फोटो पोस्ट केले होते. आता त्यांच्या लग्नासोहळ्यातील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. नव्या नवरीच्या रुपात काम्या सुंदर झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.
हेही वाचा -सारा अली खानचा मिठाईवर ताव, व्हिडिओ व्हायरल