महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मिशन मंगल' म्हणजे 'इस्रो'च्या वैज्ञानिकाचा अपमान; बॉलिवूडच्या 'या' खानने अक्षयवर साधला निशाणा - इस्रो

अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' हा त्याच्या करिअरमधला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

'मिशन मंगल' म्हणजे 'इस्रो'च्या वैज्ञानिकाचा अपमान; बॉलिवूडच्या 'या' खानने अक्षयवर साधला निशाणा

By

Published : Aug 17, 2019, 10:11 AM IST

मुंबई -बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारचा मिशन मंगल हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची उत्सुकता पाहता पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडेदेखील चांगले आहेत. तसेच अक्षयच्या करिअरमधला हा पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग करणारा चित्रपटही ठरला आहे. मात्र, बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला हा चित्रपट म्हणजे 'इस्रो'च्या वैज्ञानिकाचा अपमान आहे, असं वाटतंय. आपल्या ट्विटद्वारे त्याने अक्षय कुमारला चांगलाच टोलाही लगावला आहे.

अभिनेता कमाल आर. खान असे या अभिनेत्याचे नाव आहे. कमाल खान नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. त्यामुळेच आता अक्षय कुमारबाबतही त्याने ट्विट करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न केला आहे.

'मिशन मंगल' चित्रपटाबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्याने म्हटलेय, की 'मंगळयानावर काम करणाऱ्या वैज्ञानिकांचा या चित्रपटामध्ये अपमान करण्यात आला आहे. चित्रपटात यानावर काम करणारे वैज्ञानिक हे विनोदी रूपात सादर करण्यात आले आहेत. जे आपल्या आयुष्यात अपयशी असतात. मात्र, योगायोगाने ते मंगळयान लॉन्च करुन देतात. 'इस्रो'ने अशाप्रकारे वैज्ञानिकांचे वर्णन करण्यासाठी अक्षय कुमारला कशी परवानगी दिली, असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसंच आणखी एका ट्विटमध्ये त्याने अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. 'मी ही कधीच विचार केला नव्हता की मला एक विदेशी इतका मजबूर करेल, की मला त्याचा चित्रपट पाहायला जावे लागले. जो माझ्याच देशाचा अपमान करतो आणि मी त्याच्या चित्रपटाला चांगले म्हणावे. जर मी असं केलं नाही, तर मला सरळ देशद्रोही ठरवले जाईल आणि मला पाकिस्तानात पाठवून दिले जाईल'.
कमाल खानच्या या ट्विटवर अक्षयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अक्षयच्या चाहत्यांनी त्याला धारेवर धरले आहे. त्याच्या या ट्विटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details