महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

निवेदक राजेश दामले यांना यंदाचा 'भाऊ मराठे स्मृती पुरस्कार' जाहीर - Bhau Marathe puraskar 2019

नामवंत मुलाखतकार आणि निवेदक राजेश दामले यांना यंदाचा ' भाऊ मराठे स्मृती पुरस्कार ' जाहीर झाला आहे. येत्या ३० नोव्हेंबरला हा पुरस्कार सोहळा पुण्यात पार पडेल.

निवेदक राजेश दामले

By

Published : Nov 21, 2019, 1:58 PM IST


थर्ड बेल एंटरटेनमेंट तर्फे दरवर्षी देण्यात येणारा ' भाऊ मराठे स्मृती पुरस्कार ' यावर्षी निवेदक राजेश दामले यांना जाहीर झाला आहे. कला, मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आजवर केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

राजेश दामले यांना यंदाचा 'भाऊ मराठे स्मृती पुरस्कार' जाहीर

थर्ड बेल एंटरटेनमेंट ही संस्था गेली १५ वर्षे मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्यावतीने कलातीर्थ पुरस्कार दर वर्षी देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा 30 नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवन,नवी पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे.

राजेश दामले यांना यंदाचा 'भाऊ मराठे स्मृती पुरस्कार' जाहीर

राजेश दामले यांना कलातीर्थ पुरस्कारांतर्गत ' भाऊ मराठे स्मृती पुरस्कार ' देण्यात येणार आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ निवेदक अरुण नुलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. दामले यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details