मुंबई - दिग्दर्शक करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. या टीजरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची दमदार झलक पाहायला मिळतेय.
'कलंक' चित्रपटात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. वरूण धवन, सिद्घार्थ रॉय कपूर, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, संजय दत्त हे सर्व या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीजर रिलीज होताच एका तासाच्या आत या टीजरवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. या टीजरच्या सुरुवातीलाच माधुरी दिक्षितच्या नृत्याची झलक पाहायला मिळते. सरोज खान यांनी या नृत्याचे दिग्दर्शन केले आहे.