मुंबई- अभिनेत्री रेणुका शहाणे दिग्दर्शित आगामी ‘त्रिभंगा’ चित्रपटाचा एक इंटरेस्टिंग टीझर काजोलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तीन अचाट क्षमतेच्या महिलांची ही कथा असल्याचे टिझरवरुन लक्षात येते.
व्हिडिओ शेअर करताना, काजोलने लिहिले, "त्रिभंगा, मतलब, तेढी, मेढी, खट्याळ परंतु मादक. त्रिभंगा, प्रीमियर १५ जानेवारी रोजी फक्त नेटफ्लिक्सवर. त्रिभंगाचा २० सेकंदाचा टीझर इमोशन्समध्ये अधिक आहे आणि संवाद नसतानाही लक्ष वेधून घेतो."
दैनंदिन जीवनात कुटुंबाचे महत्त्व जाणवणाऱ्या हृदयस्पशी कथेत काजोल ओडिसी नृत्यांगना साकारताना दिसणार आहे.