महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

काजोलची ह्रदयस्पर्शी 'देवी' शॉर्ट फिल्म झाली रिलीज - Kajol starer short film Devi release

काजोल, श्रृती हासन, नेहा धुपिया सारख्या तारका असली देवी ही शॉर्ट फिल्मची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

short film Devi release
'देवी' शॉर्ट फिल्म झाली रिलीज

By

Published : Mar 2, 2020, 11:51 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री काजोलचबहुप्रतीक्षित 'देवी' शॉर्ट फिल्म आज रिलीज झाली आहे. यात ९ महिलांच्या संघर्षाचा विषय असून त्यांना एकाच छताखाली राहाणे भाग पडते. ९ वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या महिलांची आव्हाने यात दाखवली आहेत.

महिला केंद्रीत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियंका बॅनर्जीने केलंय. यात काजोल शिवाय नेहा धुपिया, नीना कुलकर्णी, श्रृती हासन, शिवानी रघुवंशी, संध्या म्हात्रे, रमा जोशी, मुक्ता बर्वे, रश्विवनी दयामा यासारख्या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.

यापूर्वीही याबद्दल काजोलने भाष्य केले होते. ती म्हणाली होती, ''मी साकारत असलेली ज्योती ही व्यक्तीरेखा माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. परंतु आम्ही खूप बदल शेअर करीत असतो. आजच्या काळात जेव्हा महिलांसोबत भेदभाव, हिंसा यावर बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. त्याकाळात 'देवी'सारखी फिल्म खूप प्रासंगिक आहे. यात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप आनंदित आहे.''

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details