मुंबई -बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन आणि काजोल यांचा मुलगा युगचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त काजोल आणि अजयने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काजोल आणि अजयला न्यासा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे. दोघेही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. काजोलने युगचा मजेशीर हावभाव असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये युग तिच्या कुशीत विसावलेला दिसतो.
अजयनेही युगसोबतचा फोटो शेअर केला आहे. 'तुला मोठं होताना पाहण्याचा आनंद हा खूप मोठा आहे', असं कॅप्शन त्याने या फोटोवर दिलं आहे.
काजोल आणि अजयने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.