मुंबईः सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीचा परिणाम दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लग्नावर झालेला नाही असे दिसते. अभिनेता राणा दग्गुबातीने आपल्या लेडीलव्ह मिहिका बजाजशी विवाहबंधन बांधल्यानंतर आता अभिनेत्री काजल अग्रवालच्या लग्नाविषयी चर्चा रंगली आहे. तिच्या लग्नाच्या अफवा वारंवार पसरत असल्या तरी, आता अलीकडेच गौतम नावाच्या एका अब्जाधीश व्यावसायिकाशी तिचे लग्न ठरल्याचे अहवालात म्हटले आहे.
काजलच्या एंगेजमेंट कार्यक्रमात तिचा फिल्म इंडस्ट्रीतील जवळचा मित्र अभिनेता बेलामकोंडा साई श्रीनिवास उपस्थित होता. लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर काजलचे लग्न होईल.