महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

८ वर्षे लोकप्रिय ठरलेल्या 'कहानी घर-घर की' मालिकेला २० वर्षे पूर्ण - 20 years of 'Kahani Ghar Ghar Ki'

'कहानी घर घर की' या लोकप्रिय मालिकेला २० वर्षे पूरण झाली आहेत. तब्बल ८ वर्षे ही मालिका टीव्हीवर लोकप्रिय होती. याचे १६६० भाग प्रसारित झाले होते.

'Kahani Ghar-Ghar Ki'
'कहानी घर घर की'

By

Published : Oct 16, 2020, 8:41 PM IST

मुंबई - टीव्हीवर लोकप्रिय ठरलेल्या 'कहानी घर घर की' ही मालिका सुरू होऊन २० वर्षे पूर्ण झाली आहेत. निर्माती एकता कपूरने इन्स्टाग्रामवर याची आठवण शेअर केली आहे. तिने या मालिकेचा टायटल ट्रॅकचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

एकताने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "२०... 'कहानी घर घर की'ची २० वर्षे"

एकताच्या या पोस्टवर 'कहानी घर घर की'च्या चाहत्यांनी आपल्या भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, "ही मालिका पाहातच मोठे झालो आहे."

आणखी एकाने लिहिलंय, ''या मालिकेसोबत अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत.''

'कहानी घर घर की' मालिकेचे १६६० एपिसोड्स प्रसारित झाले होते. सुमारे आठ वर्षे ही मालिका लोकप्रिय होती. ही मालिका श्रीलंकेतही इतकी लोकप्रिय होती की, सिंहली भाषेत याचे डबिंग करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details