मुंबई - कोरोना व्हायरपासून मुक्ती मिळावी, यासाठी देशभर लॉकडाऊन सुरू आहे. संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री ठप्प झालीय. अनेक कलाकार आयसोलेशनमध्ये गेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी संपर्कात आहेत. याकाळात सेलेब्स आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
जुही आणि सोनालीने दिला सुंदर फोटोसह पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला - सोनाली बेंद्रे
लॉकडाऊननंतर सर्व सिनेतारका घरीच अडकून पडल्या आहेत. सर्वजण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. यादरम्यान जुही चावला आणि सोनाली बेंद्रेने एक सुंदर फोटो शेअर करीत पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला दिलाय.
![जुही आणि सोनालीने दिला सुंदर फोटोसह पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला JUHI-CHAWLA-AND-SONALI-BENDRE](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6804117-332-6804117-1586953454041.jpg)
जुही आणि सोनाली
अलिकडेच जुही चावला लंडनहून भारतात परत आली आहे. त्यानंतर ती सेल्फ आयसोलेशनमध्ये दाखल झाली होती. याकाळात तिने आपला जुना फोटो शेअर केलाय. चाहत्यांना खूश करण्यासाठी तिने आपल्या उमेदीच्या कारकिर्दीतील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
सोनाली बेंद्रेनेही आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर केला आहे. सोनाली कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी सामना करून परतली आहे. सध्या ती कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी क्वारंटाईनमध्ये आहे. सोनालीने आपल्या तरुणपणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.