मुंबई- ‘एमएक्स प्लेयर' या ओ टी टी प्लॅटफॉर्म वरून 'समांतर' ही मालिका प्रसारित झाली होती. मालिकेच्या पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत. सुहास शिरवळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकारलेल्या कादंबरीवर आधारित ही वेबसिरीज असल्याने ती रेसिकांना खूप आवडली. उत्तम कथेबरोबरच सकस अभिनय, तेवढेच ताकदीचे दिग्दर्शन आणि खिळवून ठेवणारी हाताळणी यामुळे वेब सिरीजच्या पहिल्या पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या पर्वतही आम्ही तेवढीच दर्जेदार हातळणी दिली असून काही नवीन पैलू त्यात दाखल केले आहेत. त्यामुळे प्रेक्षक या दुसऱ्या पर्वलासुद्धा तेवढेच डोक्यावर घेतील अशी अपेक्षा या टीमने व्यक्त केली आहे.
काय होती पहिल्या भागाची कथा..?
सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज बेतली आहे. यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जागून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेवू लागतो.