मुंबई -निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' कादंबरीवर आधारित 'जजमेंट' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा आहे. नावावरूनच हा चित्रपट सस्पेंन्स कथा असणार याचा अंदाज बांधला जात होता. आता या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
'जजमेंट' चित्रपटात तेजश्री प्रधान, मंगेश देसाई, श्वेता पगार, माधव अभ्यंकर, सतीश सलागरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात नेमकं काय रहस्य दडलंय, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. पोस्टरमध्येही स्विमिंगपुलच्या बाजुला रक्त पडलेले दिसत आहे. यावरून या चित्रपटात काहीतरी रोमांचक पाहायला मिळणार, याचे 'जजमेंट' आपण लावू शकतो.
जोत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन अंतर्गत डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.