लॉस एंजेलिस - दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनाने भारता बाहेरील त्यांचे फॅन्सही शोकसागरात बुडाले आहेत. यात रेसलिंग चॅम्पियन आणि हॉलिवूड स्टार जॉन सीना याचाही समावेश आहे.
जॉन सीनाने ऋषी कपूर यांना वाहिली श्रध्दांजली - JOHN-CENA-PAYS-TRIBUTE-TO-RISHI-KAPOOR
बॉलिवूड कलाकारांसह आंतरराष्ट्रीय कलाकारांनीही ऋषी कपूर यांच्या निधाबद्दल शोक व्यक्त केलाय. यात हॉलिवूड स्टार जॉन सीना याचाही समावेश आहे.

जॉन सीनाने ऋषी कपूर यांचा एक हासरा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये काहीही लिहिले नसले तरी फॅन्सनी त्यावर कॉमेंट देणे सुरू केले आहे. ''एक लिजंड दुसऱ्या लिजंडबद्दल पोस्ट करीत आहे,'' असे एका युजरने म्हटलंय. तर दुसऱ्याने ''लिजंड कधी मरत नाहीत असे म्हटलंय.''
ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यानंतर बॉलिवूड तारे तारकांना धक्काच बसला. कालच इरफान खान याच्या निधनाने धक्का बसल्यानंतर आज हा बॉलिवूडला मिळालेला दुसरा मोठा झटका होता. आज ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.