मुंबई -बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही त्याच्या चित्रपटाची अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल'सोबत टक्कर होती. मात्र, एवढी तगडी टक्कर असुनही 'बाटला हाऊस' या शर्यतीत अजुनही टिकला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर आता या चित्रपटाची शंभर कोटीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'ची यशस्वी घोडदौड, शंभर कोटीकडे वाटचाल - अक्षय कुमार
'बाटला हाऊस' चित्रपटात बाटला हाऊस येथे झालेल्या एन्काऊंटरचा थरार उलगडण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. निखिल अडवाणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने ७५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

जॉनसोबत या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने भूमिका साकारली आहे. तसेच रवी किशन आणि राजेश शर्मा यांसारख्या कलाकारांच्याही यामध्ये भूमिका आहेत. नोरा फतेहीवर चित्रित झालेलं 'साकी साकी' हे गाणं देखील सोशल मीडियावर हिट झाले आहे.