मुंबई - बंगाली स्टार जिशु सेनगुप्ता याने नेपोटिझ्मवर बोलताना म्हटलंय की, तुम्ही स्टार किड असा किंवा नसा फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकणे हे तुमच्या प्रतिभा आणि नशिबावर अवलंबून असते.
शकुंतला देवी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या चित्रपटात जिशूने विद्या बालनसोबत काम केले आहे. समकालीन बंगाली चित्रपटातून आलेल्या जिशूने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
"लोक खरोखर याबद्दल का बोलत आहेत हे मला खरोखर माहित नाही. तो (नेरोटिझ्म) नेहमीच होता, तिथेच असेल. माझ्या मुलीने आधीच एक चित्रपट केला आहे. ती खूप लहान आहे पण ती एक चांगली अभिनेत्री आहे. जर तिला सिनेमामध्ये करियर करायचे असेल आणि मी तिला मदत केली तर त्या गैर काय आहे ? मी तिच्यासाठी पैसे ठेवू शकतो आणि मी करेन. जर मी तिला पाठिंबा दिला आणि तिच्यासोबत सिनेमा बनवला तर मला वाटते की ती एके दिवशी मोठी होईल, यात चुकीचे काय आहे. यात मला कोणतीही अडचण वाटत नाही. हा नेपोटिझ्म असेल तर मला माहिती नाही पण मी माझ्या मुलीला मदत करणार. मात्र एकाच अटीवर तिच्यामध्ये प्रतिभा असली पाहिजे आणि तिने ती सिध्द केली पाहिजे." असे जिशू मम्हणाला.
तो पुढे म्हणाला, "जर काही चुकीचे घडत असेल तर आपण निषेध करावा परंतु आपण पुरावा नसताना इतरांचा न्याय करू नये. यावर माझा विश्वास आहे."