मुंबई- 'बेहद' फेम जेनिफर विंगेटसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज जेनिफरचा ३४ वा वाढदिवस आहे. जेनिफरने आत्तापर्यंत अनेक मालिकात काम केले आहे. यात 'कसौटी जिंदगी की', 'सरस्वतीचंद्र', 'दिल मिल गये' सारख्या मालिकांचा समावेश आहे.
मालिकांपाठोपाठ आता वेबसीरिजमध्येही प्रेक्षकांच्या भेटीस येणार जेनिफर विंगेट - behad 2
आपल्या अभिनय कलेला एक पाऊल पुढे नेत जेनिफर 'कोड एम' नावाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये ती एका आर्मी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल.
आता आपल्या अभिनय कलेला एक पाऊल पुढे नेत जेनिफर 'कोड एम' नावाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये ती एका आर्मी अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसेल. जेनिफरला या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. जेनिफर नुकतीच 'बेहद' मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
यात तिने माया नावाचे पात्र साकारले होते. ही मालिका खूप प्रसिद्ध झाली. आता प्रेक्षक 'बेहद २' ची आतुरतेने वाट पाहात आहेत. बेहदच्या सिक्वलमध्ये जेनिफर मुख्य भूमिकेत असेल किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना काही काळ वाट पाहावी लागेल. दरम्यान सध्या वेबसीरिजमधील नवीन प्रवासासाठी जेनिफर उत्सुक असून तिचे चाहतेही तिला नवीन भूमिकेत बघण्यास आतुर आहेत.