मुंबई - बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय मानल्या जातात. त्यांच्या रागाबाबत तर सर्वांना ठावुक आहे. जर त्यांना कोणाचे वागणे आवडले नाही, तर त्या लगेच त्यावर बोलून मोकळ्या होतात. अशातच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्या एका चाहत्यांवर भडकलेल्या दिसत आहे. हा चाहता मोबाईलमध्ये त्यांचा फोटो काढत होता.
चाहत्याने परवानगीशिवाय फोटो काढल्यामुळे भडकल्या जया बच्चन, पाहा व्हिडिओ
अशातच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्या एका चाहत्यांवर भडकलेल्या दिसत आहे. हा चाहता मोबाईलमध्ये त्यांचा फोटो काढत होता.
जया बच्चन या करण जोहरची आई हीरू जोहर यांचा ७६ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या होत्या. पार्टीतून बाहेर पडल्यानंतर चाहत्यांनी त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली होती. अनेक चाहते त्यांच्या मोबाईलमध्ये जया बच्चनचे फोटो क्लिक करत होते. मात्र, जया बच्चन यांना ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी एका चाहत्याला जवळ बोलावून त्याला फोटो काढण्याबाबत रागवल्या. त्यांचा राग पाहून तो चाहता निघुन गेला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शो मध्ये करण जोहरने अभिषेक बच्चनला जया यांच्या रागाबद्दल विचारले होते. याचे उत्तर देताना अभिषेकने सांगितले होते, की जया बच्चन यांना 'क्लॉस्ट्रोफोबिक' नावाचा एक आजार आहे. या आजारामुळे गर्दी पाहून व्यक्ती घाबरत असते. त्यांना यामुळे राग येतो. जया बच्चन यांना या आजारामुळेच लवकर राग येतो, असे त्याने या शो मध्ये सांगितले होते.