मुंबई -बॉलिवूड कलाकार आपल्या फिटनेसबाबत अत्यंत जागरुक असतात. स्वत: ला फिट ठेवण्यासाठी ते नियमित व्यायाम, योगासने करत असतात. मात्र, सध्या देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार उडवला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने जिम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. आता जिम काही दिवसांसाठी जरी बंद असले, तरीही आपल्या व्यायामात खंड पडू न देता अभिनेत्री जॅकलिन आणि कॅटरिना कैफ यांनी घरच्या घरीच योगासने करण्याचा पर्याय निवडला आहे.
जॅकलिनने तिच्या घरातच योगा करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला तिने ‘व्यायाम करताना चांगलं गाणं ऐकत श्वास घेत राहा. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल,’ असा सल्ला दिला आहे. जॅकलिनने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट्सही दिल्या आहेत.
हेही वाचा -परदेशातून परतताच अनुप जलोटा यांना आयसोलेशनसाठी हलवले