मुंबई - अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय टीव्ही क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती'चा 13 वा सीझन सध्या सुरू आहे. या सिझनमध्येही अनेक स्पर्धक मोठमोठी रक्कम जिंकत आहेत. दरम्यान या शोमध्ये अधूनमधून बॉलिवूड स्टार्सही हजेरी लावत असतात. येत्या शुक्रवारी याशोमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी झळकणार आहेत.
जॅकी आणि सुनिल शेट्टीची हॉट सीटवर धमाल
दर वेळे प्रमाणे, या वेळी देखील चॅनेलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शोची एक झलक शेअर केली आहे. यात शोचे होस्ट अमिताभ बच्चन अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टीसोबत हॉट सीटवर मस्ती करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन अभिनेता जॅकी श्रॉफला 'भीडू' या शब्दाचे रहस्य विचारत असल्याचे या छोट्या झलकमध्ये दिसून येते. बिग बींनी जॅकीला विचारले की त्याने ही भाषा कोठून शिकली? जॅकीने या प्रश्नाचे उत्तर अतिशय मजेदार पद्धतीने दिले. खालील व्हिडिओमध्ये जॅकी श्रॉफ काय म्हणाले ते पहा.
जॅकीने उलगडले भीडू शब्दाचे रहस्य