महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सिद्धार्थ शुक्लाची 'आदिपुरुष'मध्ये वर्णी? स्वतःचा केला खुलासा... - 'आदिपुरुष' (Adipurush)

सिद्धार्थ 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटात काम करणार आहे, अशी कित्येक दिवसांपासून अशी बातमी आहे. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनवला जात असून यात प्रभास (Prabhas) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) सारख्या मोठ्या कलाकारांच्या भूमिका असणार आहेत. याबाबत स्वत: सिद्धार्थने आता याबाबत खुलासा केला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला म्हणतो, की अद्याप चित्रपटासाठी त्याच्याकडे संपर्क साधलेला नाही.

Siddharth
सिद्धार्थ शुक्ला

By

Published : May 29, 2021, 6:42 PM IST

मुंबई - बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चेत आहे. बिग बॉस विजेता झाल्यानंतर सिद्धार्थ नेहमी सोशल मीडियावर झळकत असतो. गेल्या कित्येक दिवसांपासून अशी बातमी आहे की, सिद्धार्थ 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटात काम करणार आहे. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनवला जात असून यात प्रभास (Prabhas) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) सारख्या मोठ्या कलाकारांच्या भूमिका असणार आहेत. हा चित्रपट रामायणवर आधारित आहे. या चित्रपटात प्रभास रामच्या भूमिकेत दिसणार असून सैफ अली खान रावणच्या भूमिकेत दिसणार आहे.

अलीकडेच या चित्रपटाविषयी बातमी आली होती की, सिद्धार्थ रावणपुत्र मेघनादची व्यक्तिरेखा साकारणार आहे. अशा परिस्थितीत स्वत: सिद्धार्थने आता याबाबत खुलासा केला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला म्हणतो, की अद्याप चित्रपटासाठी त्याच्याकडे संपर्क साधलेला नाही. एका मुलाखती दरम्यान सिद्धार्थ म्हणाला, "खरे सांगायचे तर मला कोणतीही ऑफर मिळाली नाही. त्यात सत्य आहे की नाही हे मला खरोखर माहित नाही. मला या पात्राबद्दल कोणतीही ऑफर नाही".

सिद्धार्थ शुक्लादेखील त्याच्या आगामी 'ब्रोकन बट ब्युटीफुल 3' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. त्यातील त्याची भूमिका कोणती असेल याबद्दल उत्सुकता आहे. 'ब्रोकन बट ब्युटीफुल 3' ही अगस्त्य आणि रूमीची कहाणी आहे. या वेब सिरीजमध्ये सोनिया राठी सिद्धार्थसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका अल्ट बालाजीवर 29 मे रोजी प्रदर्शित होईल.

हेही वाचा - सलमानचे वडील सलीम खान म्हणाले, "'राधे' हा अजिबात उत्तम चित्रपट नाही"

For All Latest Updates

TAGGED:

Sitara

ABOUT THE AUTHOR

...view details