मुंबई - आयरिश रॉक बँड U2 डिसेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच येणार आहे. "U2: द जोशुआ ट्री टूर" या दौऱ्याचा भाग म्हणून ते मुंबईत दाखल होतील. '1987 अल्बम' या शीर्षकाखाली १५ डिसेंबरला हा बँड मुंबईत परफॉर्म करेल. त्यांच्या दौऱ्यातील हा शेवटचा शो असेल.
भारतात पहिल्यांदाच मुंबईत 'आयरिश रॉक बँड' दाखवणार जलवा - Irish Rock Band U2 latest news
आयरिश रॉक बँड पहिल्यांदाच भारतात १५ डिसेंबरला मुंबईत परफॉर्म करणार आहे. फ्रंटमॅन बोनो, गिटारिस्ट द एज, बेसिस्ट अॅडम क्लेटन आणि ड्रमर लॅरी मुलेन ज्यूनियर या कलाकारांचा बँडमध्ये समावेश आहे.
बुक माय शो आणि लाइव्ह नेशन ग्लोबल टूरिंगच्या वतीने मुंबईत या शोचे आयोजन करण्यात आले आहे. डी. वाय पाटील स्टेडियममध्ये हा शो पार पडेल. यामध्ये फ्रंटमॅन बोनो, गिटारिस्ट द एज, बेसिस्ट अॅडम क्लेटन आणि ड्रमर लॅरी मुलेन ज्यूनियर हे परफॉर्म करणार आहेत.
या बँडने जगातील अनेक देशामध्ये आपला जलवा दाखवला आहे. पहिल्यांदाच भारतीय दौऱ्यावर येण्यासाठी बँडचे कलाकार उत्सुक आहेत. भारतीय तरुणांना त्यांच्या संगीताची जादू केवळ ऐकून माहिती आहे. परंतु यावेळी प्रत्यक्ष लाईव्ह पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.