मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इरफान खान लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. बऱ्याच काळापासून तो न्यूरो ऐंडोक्राईन ट्यूमरवर उपचारासाठी लंडन येथे गेला होता. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे पाहायला मिळतेय.
बऱ्याच काळापासून इरफान मोठ्या पडद्यापासून दुर होता. लंडन येथे उपचार सुरू असताना त्याचा'कारवां' चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचे जवळचे मित्र तसेच दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांनीही त्याच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, की 'इरफान लंडनवरून भारतात परतला आहे. त्याच्या तब्येतीत आता बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. लवकरच तो 'हिंदी मीडियम'च्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे.