‘वेल डन बेबी’ चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला - ‘वेल डन बेबी’ अमॅझॉन प्रायमवर
वेल डन बेबी हा मराठी चित्रपट येत्या ९ एप्रिल रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रसारित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांचीही एक धमाल व्यक्तीरेखा पाहायला मिळत आहे. ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे.
![‘वेल डन बेबी’ चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला Well Done Baby'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11238140-65-11238140-1617273726517.jpg)
‘वेल डन बेबी’ हा सिनेमा म्हणजे प्रेक्षकांसाठी गुढीपाडव्याची भेट असणार आहे. प्रियंका तन्वर यांचे दिग्दर्शन असलेल्या या फॅमिली ड्रामामध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यासारखे लोकप्रिय मराठी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मर्मबंध गव्हाणे यांनी लिहिले असून ट्रेलरमधून त्याच्या खुशखुशीतपणाची झलक दिसते. अमेझॉन प्राइम व्हिडीओवर मराठी चित्रपट ‘वेल डन बेबी’ चा प्रीमियर होणार या बातमीने तो सध्या चर्चेत आहे. त्यांनी वेल डन बेबी या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमाचा ट्रेलर सादर केला.