महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये साजरा होणार रणजीतचा वाढदिवस, संजीवनी देणार सरप्राईझ खास! - ‘राजा रानीची गं जोडी’ मालिका कलर्स मराठीवर

महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग कमी होत असून टीव्ही मालिकांचे शूट पूर्वीप्रमाणेच मुंबईत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नवीन ट्रॅक्स प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांना ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये सुद्धा बर्‍याच घटना बघायला मिळत आहेत. आगामी भागात खूप रंजक गोष्टी घडणार आहेत.

Raja Ranichi Ga Jodi'
‘राजा रानीची गं जोडी’

By

Published : Jul 9, 2021, 8:25 PM IST

सध्या कोरोना संक्रमण आटोक्यात आल्यासारखं वाटतंय आणि महाराष्ट्राबाहेर गेलेल्या मालिकांच्या टीम्स मुंबईत परतल्या असून आता मालिकांचे शूट पूर्वीप्रमाणेच मुंबईत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नवीन ट्रॅक्स प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांना ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये सुद्धा बर्‍याच घटना बघायला मिळत आहेत. प्रेक्षक खूप महिन्यांपासून वाट बघत होते की, संजीवनीला कधी पोलिस वर्दीमध्ये बघता येईल. PSI संजीवनीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. संजीवनीच्या आयुष्यातील संकटं मात्र अजूनही कमी झालेली नाहीत. संजीवनी घराची आणि नोकरीची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडते आहे. या सगळ्यामध्ये रणजीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

इतक्या महिन्यानंतर संजू आणि रणजीतच्या नात्यातील दुरावा दूर झाला आहे आणि सुखाचे क्षण त्यांच्या वाट्याला आले आहेत. आता रणजितचा वाढदिवस येऊ घातला आहे. रणजीतला वाढदिवसानिमित्त खास सरप्राईझ मिळणार आहे, जे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील असे संजीवनीने त्याला सांगितले आहे. पण संजू आणि रणजितच्या घरी राजश्री, अपर्णा आणि पोलिस स्टेशनमध्ये गुलाब नावाचं संकट संजीवनीची पाठ काही सोडत नाहीये. या खडतर प्रवासामध्ये घराच्यांच्या विरोधाला न जुमानता रणजीतच्या साथीने संजीवनी प्रत्येक अडथळे पार करत पुढे जात आहे.

परंतु सर्व काही सुरळीतरीत्या पार पडेल असे संजूचे नशीब नाहीये. या सर्व आनंदी क्षणांत कोणत्यातरी संकटाची चाहूल तर मिळतेय. प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडलेत ते म्हणजे काय असेल रणजितचं खास गिफ्ट? काय असेल दादासाहेबांचा प्लॅन? संजीवनीच्या हातून रणजीतला कोणतं सरप्राईझ मिळेल? अपर्णा, राजश्री आणि दादासाहेब मिळून नक्की कोणती खेळी खेळणार आहेत? राजा-रानीच्या सुखी संसारामध्ये पुन्हा एकदा कोणतं वादळ येणार? दादासाहेबांच्या या प्लॅनवर संजू रणजीतच्या साथीने कशी मात करेल? एकमेकांच्या साथीने ते या संकटाला कसे उत्तर देतील? हे सर्व बघणे उत्कंठावर्धक असणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेच्या पुढील भागांतून मिळतील.

‘राजा रानीची गं जोडी’ ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित होते.

हेही वाचा - संजीव कुमार आणि गुरुदत्त यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतींना वंदन!

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details