झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेची ३ यशस्वी पर्व गाजली. ‘रात्रीस खेळ चाले' च्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट्स प्रेक्षकांना आवडताहेत आणि ते मालिकेला भरभरून प्रेम देताहेत.
‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेने प्रेक्षकांना मनोरंजित करीत टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेला पहिल्या पर्वापासून प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे आणि म्हणूनच या मालिकेचं प्रेक्षकांच्या भेटीस आलेलं ३ पर्व देखील लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की पूर्वाचं लग्न पुन्हा लावून देण्यासाठी अभिराम प्रयत्न करतोय. त्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश देखील आलं आहे.