महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘बायको अशी हव्वी’ मालिकेत राजेशिर्के कुटुंबाचा चांगुलपणाचा मुखवटा गेलाय उतरून!

‘बायको अशी हव्वी’ ही मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. यातील उत्कंठावर्धक कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होताना दिसत आहे.

'Baiko Ashi Havvi'
‘बायको अशी हव्वी’ मालिकेतील प्रसंग

By

Published : Jul 21, 2021, 3:30 PM IST

लग्न होते तेव्हा नवरा बायकोमध्ये विश्वास असणे अत्यंत जरुरीचे असते. परंतु त्या विश्वासाला तडा गेला तर अनर्थ घडू शकतो. प्रत्येक मुलगी खूप स्वप्न घेऊन सासरचं माप ओलांडते आणि जोडीदारावर असलेल्या विश्वासाने नव्या आयुष्याची सुरुवात करते. पण जर जोडीदारानेच विश्वासघात केला तर? असेच काहीसे घडताना दिसणार आहे कलर्स मराठीवरील ‘बायको अशी हव्वी’ मालिकेमध्ये. जान्हवीसमोर खूप मोठं आव्हान येऊन ठाकलं आहे.

जान्हवी आणि विभासचं लग्न जुळण्या आधीपासून विभास आणि राजेशिर्के कुटुंब जे सत्य जान्हवी आणि तिच्या परिवारापासून लपवत होते ते आता अखेर जान्हवीसमोर आले आहे. विभासने तिच्यासमोर याबाबत कबुली देखील आहे. राजेशिर्के कुटुंब आणि विभासने जो चांगुलपणाचा मुखवटा घातला होता तो आता उतरला आहे. जान्हवीच्या आयुष्याला मिळणार वेगळं वळण मिळणार असून अजूनही काही ट्विस्ट्स प्रेक्षकांना बघायला मिळतील.

‘बायको अशी हव्वी’ मालिकेतील प्रसंग

हे सत्य समोर आल्यावर जान्हवीच्या आयुष्यात पुढे आता काय घडेल हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवीने विभासला सांगितले आहे, हे घर माझे आहे आणि माझं घर सोडून मी कुठेही जाणार नाही. मी इथल्या माणसांच्या धारणा आणि हे घर बदलून टाकणार, आणि तूच म्हणशील “बायको अशी हव्वी”. जान्हवीने आयुष्य बदलून टाकणारा निर्णय घेतला आहे. हे सत्य समोर आल्याने विभास जान्हवी एकमेकांपासून दूर होतील की विभासने खोटं मान्य केल्याने नातं जुळेल हे बघणे इंटरेस्टिंग असेल.

जान्हवी दिलेला शब्द कसा पूर्ण करेल व कोणकोणती आव्हान तिच्यासमोर येतील आणि तिच्या आयुष्यात पुढे काय घडेल तसेच ती कसा यातून मार्ग काढेल हे बघणे प्रेक्षकांसाठी मनोरंजक असणार आहे.

हेही वाचा - ‘अजूनही बरसात आहे' मध्ये भूतकाळ आणि वर्तमानकाळाचा खेळ

ABOUT THE AUTHOR

...view details