नाशिक- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’ असे म्हणत अनेक अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत होत्या आणि ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश देत होत्या. हा नक्की काय प्रकार आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.अभिनेत्रींच्या या अशा व्हिडीओमुळे लोकांच्या मनात संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर यावरील पडदा उठला असून त्याचे कारण आपल्या समोर आले आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'अनुराधा' ही ७ भागांची वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी', व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे,आणि त्याच्याच प्रमोशनचा हा एक भाग होता. या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
तेजस्वीनीचा बोल्ड अंदाज