महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

इंडियन आयडॉल 12 : जळगावच्या युवराजचा सेटवर झाडू मारण्यापासून स्पर्धक बनण्यापर्यंतचा प्रवास - Yuvraj Medhe

इंडियन आयडॉलच्या सेटवर सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या तरुणाने इंडियन आयडॉलमध्ये गाण्याचे स्वप्न पाहिले आणि ते आता पूर्ण होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील युवराज मेढेचा हा प्रवास थक्क करणारा आहे.

Yuvraj Medhe
युवराज मेढे

By

Published : Nov 26, 2020, 7:38 PM IST

Updated : Nov 26, 2020, 7:47 PM IST

मुंबई- 'इंडियन आयडल 12'मधील युवराज मेढे याच्या ऑडिशनची एक क्लिप सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. याच गाण्याच्या सेटवर तो सेटिंगचे काम करतो. ज्या सेटवर झाडू हातात घेऊन काम करतो, त्याच सेटवर त्याला गाण्याची संधी मिळाली आहे.

२८ नोव्हेंबर रोजी 'इंडियन आयडल 12' प्रसारित होणार आहे. त्यापूर्वी सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनीने युवराजचा एक प्रोमो ट्विट केला होता. तो आता व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओत युवराजला शोचे परीक्षक नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी विचारताना दिसतात, की गाणे कुठे शिकला. त्यावर तो म्हणतो की मी कुठेही गाणे शिकलो नाही. याच सेटवर गाण्याचे धडे गिरवले. तुम्ही जेव्हा एखाद्या स्पर्धकाला गाण्यानंतर ज्या कॉमेंट्स द्यायच्या त्या ऐकून मी गाणे शिकलो. युवराजच्या या उत्तरानंतर तिनही परीक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळलेले पाहायला मिळाले.

हेही वाचा -मला कडक अ‌ॅक्शनमध्ये हात आजमवायचा आहे - अनन्या पांडे

युवराज मेढे हा जळगाव जिल्ह्यातील तरुण आहे. गाण्याची आवड असलेल्या युवराजने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली भरपूर धडपड केली. मित्रांच्यात मैफिली गाजवणारा युवराज आपली आवड जोपासण्यासाठी इंडियन ऑयडॉलच्या सेटवर दाखल झाला पण ते सेटवरील सफाई कर्मचारी म्हणून. तो एकलव्यासारखा शिकत राहिला. स्पर्धकांच्या गाण्यातील चुकांवर परीक्षक नेहमी आपल्या प्रतिक्रिया देत असतात. त्या तो समजून घेत राहिला आणि आज तो याच शोचा एक अविभाज्या भाग बनला आहे.

याबद्दल बोलताना युवराज म्हणाला, "मी गेली तीन-चार वर्षे इंडियन आयडॉलच्या सेटवर काम करत आहे. माझे मित्र इथे काम करायचे. मी इथे झाडून काढण्याचे आणि सेट नीट ठेवण्याचे काम करीत होतो."

तो पुढे म्हणाला, "यापूर्वी या कार्यक्रमात भाग घेण्याचा आणि आपली प्रतिभा व्यक्त करण्याचा आत्मविश्वास मला कधीच नव्हता. मी माझ्या मित्रांना गायन आणि कथन करायचो. ते माझे कौतुक करत असत आणि मला कार्यक्रमात भाग घेण्यास प्रेरित करत असत. माझे मित्र म्हणायचे, जर एक बूट पॉलिशर येथे आला आणि जिंकू शकला तर तू का नाही?"

हेही वाचा -'आश्रम' वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनची बॉबी देओलला प्रतीक्षा

यापूर्वीच्या सिझनमध्ये सनी हिंदुस्थानी हा स्पर्धक विजेता ठरला होता. बट पॉलिश करणारा सनी इंडियन आयडॉल ठरल्यामुळे युवराजला तो प्रेरणादायी वाटतो.

तो पुढे म्हणतो, "मला असं कधी वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मला गाण्याची संधी मिळेल. मी खूप आनंदी आहे. लोक मला कॉल करीत आहेत, मेसेज पाठवत आहेत. माझे पालकही खूप आनंदी आहेत."

Last Updated : Nov 26, 2020, 7:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details