महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

इंडियन आयडॉल-१२ : अलका याग्निक व कुमार सानू यांची सांगीतिक लढाई - कुमार सानू

इंडियन आयडॉलचे १२वे पर्व सुरु झाले आहे व उत्तमोत्तम स्पर्धक स्पर्धा करताना दिसताहेत. या शोमध्ये आता अलका याग्निक व कुमार सानू सुद्धा नव्वदीतील सांगीतिक लढाईसाठी सज्ज झाले आहेत. यात उदित नारायण सुद्धा सामील होणार आहेत.

इंडियन आयडॉल-१२

By

Published : Jan 28, 2021, 12:14 PM IST

मुंबई- उत्तम संगीताचा रियालिटी शो इंडियन आयडॉलचे १२वे पर्व सुरु आहे व उत्तमोत्तम स्पर्धक स्पर्धा करताना दिसताहेत. या शोमध्ये आता अलका याग्निक व कुमार सानू सुद्धा दिसणार आहेत, स्पर्धक म्हणून नव्हे तर नव्वदीतील सांगीतिक लढाईसाठी, ज्यात उदित नारायण सुद्धा सामील होणार आहेत. ९० चे दशक हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व सदाहरित गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि अलका, उदित आणि कुमार सानू यांनी ते दशक आपल्या बेफाट गायकीने गाजविले होते. इंडियन आयडॉल-१२मध्ये ९० च्या काळातील तोच उत्साह चिरंतन ठेवण्यासाठी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने ‘नाईंटीज स्पेशल’ एपिसोड तयार केला आहे.

हा विशेष एपिसोड संगीत क्षेत्रातील एक आख्यायिका ठरेल. यात अलका याज्ञिक, कुमार सानू आणि उदित नारायण सुमधुर गाणी गाताना दिसणार आहेत. संगीत क्षेत्रातील आदर्श व्यक्तींसमोर, ज्यांची गाणी ऐकत स्पर्धक मोठे झाले, त्यांच्यासमोर सादरीकरण करण्यास कॉन्टेस्टंट्स खूप उत्सुक आहेत. या भागात अलका याग्निक व कुमार सानू समोरासमोर सांगीतिक लढाईसाठी उभे ठाकणार असून सर्व स्पर्धक त्यांच्या टीममध्ये विभागले जाणार आहेत. सर्व मुली कुमार सानूच्या बाजूने तर मुले अलका याज्ञिक यांच्याकडून स्पर्धा लढणार आहेत. नव्वदीच्या या स्पेशल एपिसोडचे वैशिष्ट्य म्हणजे, यात सुमारे १०० गाणी समाविष्ट असून ती सगळेच जण गाणार आहेत.

सर्व कॉन्टेस्टंट्स उल्हासित व उत्साहित आहेत या सुप्रसिद्ध गायकांसमोर आपली कला पेश करण्यासाठी. त्यांनी म्हटले की, ‘अलकाजी, कुमार सानू सर आणि उदित नारायणजी यांच्यासमोर परफॉर्म करण्यासाठी आम्ही उतावीळ झालो आहोत. फार काळ प्रतीक्षा करू शकत नाही. आम्ही अजून काय सांगणार? या एपिसोडसाठी आमची तयारी आणि सराव जोरात सुरू आहे. आम्ही आमच्या सर्वोच्च पातळीवर प्रयत्न करू.” जज विशाल दादलानी, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनीही स्पर्धकांच्या सूरात सुरात सूर मिसळत म्हटले की, ‘या नव्वदीच्या स्पेशल विकेंडसाठी आमची मुले ‘सुपर चार्ज्ड‘ झाली असून आमचीही तीच स्थिती आहे. अलकाजी, कुमार सानूजी आणि उदित नारायणजी हे आमचे कायमच प्रेरणास्थान राहिले आहे. आमच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिल्याने निश्चितच शो ची शान वाढणार.”

हेही वाचा - ‘मिर्झापूर’ फेम दिव्येंदू शर्मा ‘मेरे देश की धरती’ मधून दिसणार शेतकऱ्याच्या भूमिकेत!

हा नव्वदीचा स्पेशल सांगीतिक-लढाई भाग या वीकएंडला रात्री ८ वाजता ‘इंडियन आयडॉल सीझन १२’ मध्ये पाहायला मिळेल.

हेही वाचा- ‘शाबास मितू’ म्हणत तापसी पन्नू घेतेय क्रिकेटचे धडे!

ABOUT THE AUTHOR

...view details