मुंबई - कपिल शर्माने त्याच्या पहिल्या स्टँड अप कॉमेडी शोमध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले आहेत. त्याने नेटफ्लिक्स शोमध्ये सांगितले की, पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर त्याचा अनुभव कसा होता. किस्सा शेअर करताना कपिल शर्माने सांगितले की, जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा अंडरवर्ल्डची खूप भीती होती. त्यामुळे त्याने त्याचे पैसे त्याच्या अंडरवेअरमध्ये लपवले होते.
‘आय एम नॉट डन येट’ या नवीन शोमध्ये पहिल्यांदाच मुंबईत येण्याचा अनुभव सांगताना कपिल शर्माने खिशात बाराशे रुपये आणल्याचे सांगितले. त्याने सांगितले की, ग्रॅज्युएशननंतर तो तीन महिन्यांच्या ब्रेकमध्ये मुंबईला फिरायला आला होता. खिशात केवळ १२०० रुपये घेऊन तो पहिल्यांदा संघर्ष करायला आला, तेव्हा त्याच्यासोबत कॉलेजचे काही मित्रही होते. कपिल शर्माने सांगितले की, तेव्हा त्याने ऐकले होते की, मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा आहे. त्यामुळे घाबरून त्याने पैसे त्याच्या अंडरवेअरमध्ये लपवले होते. स्टँड-अप कॉमेडी करताना कपिल शर्मा म्हणाला, “लोक म्हणतात, मुंबईत आल्यावर स्टेशनवर झोपा, पण असं होत नाही. पोलीस मारहाण करतात, काही विचार करण्याची संधीही मिळत नाही.”