महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘आई कुठे काय करते’ मध्ये अरुंधती स्वतःलाच देते वाढदिवसाचे गिफ्ट, अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस! - मधुराणी गोखले प्रभुलकर

‘आई कुठे काय करते’ उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच अरुंधती अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस देणार आहे. अरुंधतीच्या या निर्णयामुळे अनिरुद्धच्या अहंकाराला धक्का बसणार हे नक्की.

Aai Kuthe Kay Karte
आई कुठे काय करते

By

Published : Jan 13, 2021, 3:39 PM IST

मुंबई- प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस खूप महत्वाचा असतो व त्या दिवशी मिळणाऱ्या गिफ्ट्सना एक भावनिक कडा असते. कधीकधी स्वतः स्वतःलाच गिफ्ट देण्यात अतीव आनंद असतो व ही भावना अनुभवताना दिसणार आहे ‘आई कुठे काय करते’ माकिलेतील अरुंधती. आपला बदफैली नवरा अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस देऊन अरुंधती स्वतःलाच देते आपल्या वाढदिवसाचे गिफ्ट.

स्टार प्रवाहवरील मालिका ‘आई कुठे काय करते’ उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच अरुंधती अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस देणार आहे. अरुंधतीच्या या निर्णयामुळे अनिरुद्धच्या अहंकाराला धक्का बसणार हे नक्की. खरतर अनिरुद्धकडून फसवणूक झाल्यानंतर खचून न जाता अरुंधती स्वयंपूर्ण झाली आणि कठीण प्रसंगात तिने स्वत:ला आणि संपूर्ण कुटुंबाला सावरलं. आता मात्र नको असलेल्या बंधनातून मुक्त व्हायचं अरुंधतीने ठरवलं आहे. त्यामुळेच अनिरुद्धला घटस्फोट देण्याचा मोठा निर्णय तिने घेतला आहे.

मालिकेतल्या या निर्णायक वळणाबद्दल सांगताना अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर म्हणाल्या, ‘एकेकाळी अनिरुद्धवर मनापासून प्रेम केल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेणं अरुंधतीसाठी सोपी गोष्ट नाही. या परिस्थितीचा सामना खूप धाडसाने आणि धैर्याने करायचं तिने ठरवलं आहे. आई कुठे काय करते मालिकेतून स्थिर असा स्त्रीवाद दाखवण्यात येत आहे. कुठेही आरडाओरडा नाही, स्त्रीमुक्ती चळवळीच्या घोषणा नाहीत, आक्रस्ताळेपणा नाही. अरुंधती अत्यंत ठामपणे आणि सत्सकविवेकबुद्धीला स्मरुन शांतपणे निर्णय घेते हे तिच्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण आहे. या सगळ्यात घरातल्या जबाबदाऱ्या न नाकारता इतर कोणतीही नाती न विस्कटू देता ती तिच्या न्यायासाठी लढते आहे.’

हेही वाचा - झाडांना पण एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे मान द्या, तरच लोक त्यांना जपतील’, डॉ. अमोल कोल्हे!
आजवर अरुंधतीचं खंबीर रुप प्रेक्षकांनी पाहिलं आहे. त्यामुळे अरुंधतीचा पुढचा प्रवास कसा असणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details