मुंबई -कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांची जोडी असलेला 'लव्ह आज कल' चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली, हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव 'लव्ह आज कल २' असे असेल, असे सर्वांना वाटले होते. मात्र, या चित्रपटाचे नाव काय असणार याचा खुलासा इम्तियाजने त्याच्या एका पोस्टमधून केला आहे.
'लव्ह आज कल-२' नाही, तर 'हे' असणार कार्तिक साराच्या सिक्वेलचं नाव - kartik aryan
इम्तियाज अलीने सारा आणि कार्तिकचा एक फोटो शेअर करून चित्रपटाच्या सिक्वेलचे नाव जाहीर केले आहे.
इम्तियाज अलीने सारा आणि कार्तिकचा एक फोटो शेअर करून चित्रपटाच्या सिक्वेलचे नाव जाहीर केले आहे. 'आजकल' असे या चित्रपटाचे नाव राहणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचे शूटिंग अलिकडेच पूर्ण झाले आहे.
शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कार्तिक भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तर, सारानेही एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या चित्रपटात रणदीप हुडा देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या वर्षी १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
कार्तिक या चित्रपटानंतर 'पती पत्नी और वो' या चित्रपटाच्या रिमेकमध्येही झळकणार आहे. भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे त्याच्यासोबत या चित्रपटात झळकणार आहेत.