मुंबई- दिग्गज गायिका आणि अभिनेत्री इला अरुण ''घुमकेतू'' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करीत आहेत. गेली चार दशके सिने पडद्यावर अभिनय करणाऱ्या इला यांना नवजुद्दीनसोबत काम करताना सुरुवातीला संशय वाटत होता.
'घुमकेतू' या चित्रपटात नवाजुद्दीन मुख्य भूमिकेत आहे. बिहारमधून मुंबईत अभिनय करण्यासाठी आलेल्या स्ट्रगलिंग अॅक्टरच्या भूमिकेत तो आहे.
"मी अशा कलाकारांपैकी एक नाही ज्यांना असे वाटते की, जास्त काळ काम केल्यामुळे किंवा अनुभव घेतल्यामुळे श्रेष्ठ बनता येते. अभिनयाची शैली विकसित होत आहे, कामगिरी विकसित होत आहे आणि मला समकालिन होण्यासाठी स्वतःमध्ये सतत बदल करावे लागतील. नवाजुद्दीन हा खूप चांगला अभिनेता आहे आणि त्याच्यावर प्रभावित झाले आहे. खरंतर सुरुवातील त्याच्यासोबत काम करताना मी संशय व्यक्त केला होता,'' असे इला अरुण म्हणाल्या.