नवी दिल्ली - नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'एके व्हर्सेस एके' या शोच्या ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेली भाषा व चुकीच्या एअर फोर्स गणवेशावर भारतीय वायू दलाने आक्षेप घेतला आहे.
भारतीय हवाई दलाने (आयएएफ) एका ट्विटमध्ये म्हटले आहे की "संबंधित सीन्स" मागे घेण्याची आवश्यकता आहे.
"या व्हिडिओमधील आयएएफ गणवेश चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला आहे आणि वापरलेली भाषा अयोग्य आहे. हे भारतीय सशस्त्र दलात असलेल्या लोकांच्या वागणुकीच्या निकषांशी योग्य नाही. संबंधित सीन्स मागे घेण्याची आवश्यकता आहे., असे ट्विटमध्ये म्हटले आहे.