मुंबई- अमृता फडणवीस यांचे 'तिला जगू द्या' हे गीत भाऊबीजेच्या दिवशी रिलीज झाले होते. टी सिरीजची निर्मिती असलेल्या या गाण्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या गाण्यावरुन अमृता यांच्यावर टीकेची झोडही उठली असली तरी त्यांनी टीका करणाऱ्यांचे आणि कौतुक करणाऱ्यांचे स्वागत केले आहे.
अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करुन प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. "तिला जगू द्या या गाण्याचे कौतुक करणाऱ्या सर्वांचे आभार. या गाण्याला २ दिवसात १० लाख व्यूव्ह्ज मिळाले आहेत!! या गाण्याचे कौतुक करणाऱ्या आणि टीका करणाऱ्यांचे स्वागत मी स्वागत करते. लवकरच काही तरी नवीन घेऊन परत येत आहे!", अशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा नव्या गाण्यासह प्रेक्षकांच्या भेटीस येतील हे नक्की.
हेही वाचा - ''मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन'' : महेश टिळेकरांची अमृता फडणवीसांच्या गायनावर जोरदार टीका