मुंबई - ‘मिर्झापूर’च्या दुसर्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मालिका आता रिलीज झाल्यानंतरही याला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी लोकांमध्ये उत्साह अजूनही कायम आहे. कलाकारांनी कथेतल्या पात्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
मालिकेत गजगामिनी गुप्ता उर्फ गोलू या व्यक्तिरेखेची खूप चर्चा आहे. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठीला तिच्या भूमिकेतील बदलांविषयी विचारले होते. ती म्हणाली, "आम्ही कधीकधी आपल्या आयुष्यात अशा टप्प्यावर पोहोचतो जिथे आपल्याला दोनपैकी एकच गोष्ट निवडायची असते, तेव्हा गोलूलादेखील एकच पर्याय होता. तो म्हणजे सूड घेणे. सूड न घेतल्यास सूड उगवणार होता. गोलूला बंदूक धरुन इतका आनंद होत नसला तरी स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी अजूनही हे सर्व करावे लागत आहे. मला या सिझनमधील गोलूबद्दल वाईट वाटते, कारण तिचे लक्ष फक्त बदला घेण्यावर आहे आणि तिची परिस्थिती समजून घेण्यासारखे कोणीही नाही. "
मालिकेची कहाणी गुंफलेले लेखक पुनीत कृष्णा म्हणाले, “एखादी कथा बंद खोलीत किंवा तिच्या निर्मितीच्या काळात लिहित असताना असे कधीच वाटले नव्हते की ही मालिका इतकी हिट ठरेल.''