महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मन उडू उडू झालं' मालिकेत झळकणार अजिंक्य राऊतसह हृता दुर्गुळे - 'मन उडू उडू झालं' मालिकेत झळकणार अजिंक्य राऊत

हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत लवकरच 'मन उडू उडू झालं' या मालिकेत पहिल्यांदाच झळकणार आहेत. या मालिकेचा टिझर आणि प्रोमो हृताने शेअर केलाय.

Hruta Durgule
हृता दुर्गुळे

By

Published : Aug 4, 2021, 6:19 PM IST

अभिनेत्री हृता दुर्गुळेची नवी मालिका झी मराठीवर सुरू होतेय. मालिकेचे शीर्षक आहे 'मन उडू उडू झालं'. या मालिकेतून हृता आणि अजिंक्य राऊत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ही जोडी पाहण्यासाठी त्यांचे चाहते पुन्हा उतावीळ झाले आहेत.

'मन उडू उडू झालं' मालिका 30 ऑगस्टपासून झी मराठीवर प्रसारित होईल. हृता दुर्गुळेने या मालिकेचा टिझर आणि प्रोमो शेअर केला आहे. याच्या शीर्षकामध्ये तिने, ''कमिंग बॅक होम वाली फिलींग''.

हृता दुर्गुळेने 'दुर्वा' आणि 'फुलपाखरु' मालिकेतून रसिकांची मने जिंकली होती. 'सिंगिंग स्टार' या शोमध्येही ती सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसली होती.

हेही वाचा - Pornography Case : कपडे उतरवून गहनाने साधला चाहत्यांशी संवाद; विचारले, मी वल्गर वाटते का?

ABOUT THE AUTHOR

...view details