झी युवावरील 'फुलपाखरू' या मालिकेला नुकतीच 2 वर्ष पूर्ण झाली. मात्र प्रेक्षकांचं या मालिकेवरील प्रेम तसूभरही कमी झालेल नाही. मालिकेतील मुख्य जोडी, मानस आणि वैदेही यांचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. सोशल मीडियावरील अनेक पेजेस, ग्रुप्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे या जोडीवर असलेले प्रेम वेळोवेळी दिसून येते. यशोमन आपटे आणि हृता दुर्गुळे ही जोडी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. त्यातही हृता दुर्गुळेचे चाहते तिच्या सौंदर्यावर व कामावर खूपच खूश आहेत. अनेक तरुणांसाठी 'दिलाची धडकन' असलेली हृता प्रेक्षकांचे प्रेम आणि जिव्हाळा यांचा केंद्रबिंदू ठरली आहे. तिच्या अशाच एका चाहत्याने, तिचे एक छानसे चित्र तिला भेट म्हणून दिल आहे. उमेश पांचाळ या चित्रकाराने हृताचे हे हुबेहूब चित्र काढले आहे.
सोशल मीडियावर अनेक पेजेसमधून चाहतावर्ग आपले प्रेम व्यक्त करतो आहे. कलाकारांची ओळख, मालिकेतील पात्राच्या नावाने होऊन जाणे अशा घटनासुद्धा घडत असतात. पण, चाहत्यांनी कलाकारावरील आपलं प्रेम, आपुलकी याप्रकारे दर्शवण्याच्या घटना त्यांच्यासाठी कामाची मोठी पोचपावती ठरतात. हृता याचाच अनुभव सध्या घेत आहे.