महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील दिपूवर म्हणजेच हृता दुर्गुळेवर प्रेक्षक फिदा! - Ajinkya Raut

‘मन उडू उडू झालं’ ही मालिका झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेच्या प्रोमोजपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता खूप होती. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.

Hruta Durgule and Ajinkya Raut thank fans for love and support
चाहत्यांच्या मनाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री म्हणजे हृता  दुर्गुळे.

By

Published : Sep 6, 2021, 6:26 AM IST

मुंबई - आपल्या सौंदर्यांमुळे आणि उत्तम अभिनयशैलीमुळे चाहत्यांच्या मनाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. हृता सध्या ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत दीपिका देशपांडेची भूमिका निभावतेय. दीपिका ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असून ती आपल्या वडिलांच्या तत्वांना धरून आयुष्यात पुढे जातेय. पण इंद्रा तिच्या आयुष्यात आल्यानंतर पुढे काय होणार हे पाहाणं औस्त्युक्याचं ठरणार आहे. मालिकेत दीपिकाचा लूक अत्यंत साधा पण तितकाच मोहक आहे. साधेपणातच सुदंरता असते, याचा प्रत्यय दीपिकाकडे पाहून येतो.

'मन उडू उडू झालं' मालिकेत झळकणार अजिंक्य राऊतसह हृता दुर्गुळे
‘मन उडू उडू झालं’ ही मालिका झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेच्या प्रोमोजपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता खूप होती. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली आहे. तसंच तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या मालिकेतील लूकवर प्रेक्षक आणि चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. इतकंच नव्हे तर दीपिका आणि इंद्राची जोडी देखील प्रेक्षकांना अत्यंत भावली आहे. सोशल मीडियावरून या दोघांसाठी चाहते आपलं प्रेम फोटो आणि व्हिडिओच्या रूपात व्यक्त करताना दिसत आहेत. प्रेक्षकांचं अफाट प्रेम पाहून हृता दुर्गुळेआणि अजिंक्य देखील भारावून गेले आहेत. आपल्या सोशल मीडियावरून हृता दुर्गुळे आणि अजिंक्यने मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या भरगोस प्रतिसादासाठी त्यांचे आभार मानले आहेत. हृता दुर्गुळेने 'दुर्वा' आणि 'फुलपाखरु' मालिकेतून रसिकांची मने जिंकली होती. 'सिंगिंग स्टार' या शोमध्येही ती सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसली होती. हृता दुर्गुळे हिचा चाहता वर्गमोठा आहे

ABOUT THE AUTHOR

...view details