मुंबई - हृतिक रोशनचा 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळाले. ट्रेलर पाहून चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटातलं दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातून बेरंग जगाचं रंगलेलं वास्तव पाहायला मिळतं.
हृतिक रोशनच्या 'सुपर ३०'चं दुसरं गाणं प्रदर्शित, पाहा बेरंग जगाचं रंगलेलं वास्तव - amitabh bhattacharya
पैशांच्या व्यवहारावर हे गाणं आधारित आहे. विशाल ददलानी आणि अजय-अतुल यांनी मिळून हे गाणं कपोज केलं आहे. तर, अमिताभ भट्टाचार्या यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
पैशांच्या व्यवहारावर हे गाणं आधारित आहे. विशाल ददलानी आणि अजय-अतुल यांनी मिळून हे गाणं कपोज केलं आहे. तर, अमिताभ भट्टाचार्या यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
सोशल मीडियावर या गाण्याला चाहत्यांचा चागंला प्रतिसाद मिळत आहे. हृतिकनेही एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आभार मानले आहेत.
या चित्रपटातील आधी 'जुगराफिया' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्यात मृणाल ठाकुर आणि हृतिकची केमेस्ट्री पाहायला मिळाली. श्रेया घोषाल आणि उदित नारायण यांनी हे गाणे गायले होते. हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. विकास बहल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.