महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सुपर ३०' चित्रपट आता स्वस्तात पाहा, राज्य वस्तू व सेवाकरात सवलत - सुपर ३०

या चित्रपटातून आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश मिळू शकते, असा संदेश दिला गेला आहे. हाच संदेश सर्वसामान्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचावा यासाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधील राज्य वस्तू व सेवा कराची (एसजीएसटी) सवलत देण्यास मंजुरी देण्यात आली.

'सुपर ३०' चित्रपट आता स्वस्तात पाहा, राज्य वस्तू व सेवाकरात सवलत

By

Published : Jul 30, 2019, 8:17 PM IST

मुंबई -बिहारमधील प्रसिद्ध गणिततज्ज्ञ आनंदकुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' हा चित्रपट आता प्रेक्षकांना अगदी स्वस्तात पाहता येणार आहे. या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

आनंदकुमार यांनी 'रामानुजन स्कुल ऑफ मॅथेमेटिक्स'च्या माध्यमातून बिहारमधील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हुशार विद्यार्थ्यांना जे.ई.ई. आणि तत्सम स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. त्यांचे अनेक विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झालेले आहेत. त्यांचा हाच प्रवास 'सुपर ३०'मध्ये दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटातून आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश मिळू शकते, असा संदेश दिला गेला आहे. हाच संदेश सर्वसामान्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचावा यासाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधील राज्य वस्तू व सेवा कराची (एसजीएसटी) सवलत देण्यास मंजुरी देण्यात आली.

या निर्णयानुसार प्रेक्षकांकडून एसजीएसटी वसूल न करता, चित्रपटगृहाकडून भरणा करुन घेण्यात येणार आहे. त्यांनतर शासन निर्णय निर्गमित झालेल्या तारखेपासून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीतील तिकीट विक्रीवर भरणा झालेल्या एसजीएसटीचा परतावा शासन निर्णयातील तरतुदींनुसार चित्रपटगृहांना दिला जाणार आहे.

बॉक्स ऑफिसवर दमदार यश
'सुपर ३०' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने १२५ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details