मुंबई - हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जात या चित्रपटाने काही दिवसांपूर्वीच प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तसेच या चित्रपटाचं मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आलं आहे.
हृतिकच्या 'सुपर ३०'चं मोशन पोस्टर प्रदर्शित, ट्रेलरही आज येणार प्रेक्षकांच्या भेटीला - bollywood
येत्या १२ जुलैला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हृतिक रोशन या चित्रपटात आनंद कुमार या गणित तज्ज्ञाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. आनंद कुमार आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे.

या चित्रपटात हृतिकसोबत मृणाल ठाकूर, नंदिश सिंग, अमित सध आणि पंकज त्रिपाठी हे कलाकारदेखील झळकणार आहेत. या चित्रपटाचं एक नवं पोस्टर शेअर करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्रेलर प्रदर्शनाच्या तारखेविषयी माहिती दिली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. मीटूप्रकरणी विकास यांच्यावर आरोप झाल्यानंतर चित्रपटाच्या क्रेडीटमधून त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं. मात्र, आता याप्रकरणी विकास बहलला क्लीन चीट मिळाली असून पुन्हा एकदा त्यांना चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं श्रेय देण्यात आलं आहे.