मुंबई - हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' चित्रपटाची अखेर प्रतिक्षा संपली आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चाहत्यांना आतुरता आहे. वेळोवेळी या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तारखा बदलण्यात येत होत्या. आता मात्र, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' चं पहिलं पोस्टर प्रदर्शित - teacher
हृतिक रोशन या चित्रपटात आनंद कुमार या गणिततज्ञाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. आनंद कुमार आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे.
हृतिक रोशन या चित्रपटात आनंद कुमार या गणिततज्ञाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. आनंद कुमार आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्याबरोबर यावर चाहत्यांच्या भरभरुन कमेंट्स देत आहेत.
सध्या हृतिक त्याच्या 'काबिल' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चीनमध्ये गेला आहे. चीनी प्रेक्षकांचादेखील 'काबिल' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.