महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हृतिकसोबत जमणार दीपिकाची जोडी, 'या' चित्रपटाच्या रिमेकमध्ये साकारणार भूमिका - super 30

बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि फराह खान यांनी देखील काही दिवसांपूर्वी एकत्र येऊन एका चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केली होती. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हृतिकसोबत जमणार दीपिकाची जोडी, 'या' चित्रपटाच्या रिमेकमध्ये साकारणार भूमिका

By

Published : Jul 9, 2019, 8:03 PM IST

मुंबई -बॉलिवूडमध्ये सध्या जुन्या चित्रपटांच्या रिमेकचा ट्रेण्ड सुरू आहे. आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांचे रिमेक प्रेक्षकांना पाहायला मिळाले. काही चित्रपटांचे सिक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच आता बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि फराह खान यांनीदेखील काही दिवसांपूर्वी एकत्र येऊन एका चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केली होती. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या जोडीचा 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे. या रिमेकमध्ये हृतिक आणि दीपिकाची वर्णी लागली आहे. यापूर्वी या चित्रपटात शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र, एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, हृतिक आणि दीपिकाची या चित्रपटासाठी निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांना संधी मिळणार आहे.

दीपिकाने अलिकडेच तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तर, रणवीर सिंगसोबत ती '८३' या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटानंतर ती 'सत्ते पे सत्ता' चित्रपटाच्या रिमेकची शूटिंग करणार आहे. फराह खानसोबत हा तिचा तिसरा चित्रपट असणार आहे. तर, रोहित शेट्टीसोबत ती दुसऱ्यांदा काम करणार आहे. हृतिकसोबत ती पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करेल. रोहित शेट्टी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर, फराह खान दिग्दर्शनीय धुरा सांभाळणार आहे.

हृतिक सध्या त्याच्या 'सुपर ३०' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या १२ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तसेच, टायगर श्रॉफसोबतही तो एका अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details